महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त ‘आफ्टरनून व्हॉईस’तर्फे १७व्या न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड्स सोहळ्यात पं. हृदयनाथ मंगेशकर, रामलाल, उदय सामंत, योगेश कदम, अनु अग्रवाल आदींना सन्मानित करण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबतची इच्छा आणि खंत जाहीरपणे व्यक्त केली आहे.
“गेल्या दहा वर्षांतील प्रत्येक हत्याकांडाला अमित शाह जबाबदार आहेत, तरीही मोदी त्यांना पदावर का ठेवत आहेत?” असा सवाल त्यांनी केला. काश्मीरमध्ये झालेल्या हत्याकांडात २७ लोक ठार झाले असून, त्यापैकी ६ जण महाराष्ट्रातील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाने राज्य अॅग्रीगेटर कॅब धोरण २०२५ अंतर्गत एक नवे आदेश लागू केले आहे, ज्यामुळे ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांना ड्रायव्हरने राईड रद्द केल्यास प्रवाशाला भरपाई देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शहरातील अंधेरी परिसरात शुक्रवारी (२ मे) सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात ३५ वर्षीय दुचाकीस्वार इसमाचा डावा हात बीईएसटी बसखाली येऊन तुटला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमावर होली स्पिरीट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र टीका केली आहे. राऊत यांनी देशातील सुरक्षा स्थिती, दहशतवादी हल्ले, आणि त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भू-राजकीय तणाव आणि जागतिक मंदी असूनही, २०२५ च्या पहिल्या चार महिन्यांत मुंबईच्या मालमत्ता नोंदणीने नवे उच्चांक गाठले आहेत. जानेवारी ते एप्रिल २०२५ मध्ये मुंबईत मालमत्ता नोंदणीतून मिळालेले एकूण महसूल आणि एकूण नोंदणी विक्रमी उच्चांकावर होती.
Flamingos In Mumbai: मुंबईतील मोगरा नाल्याजवळ lesser flamingos अर्थात लहान फ्लेमिंगोंचे थवे दिसून आले आहेत. हे फ्लेमिंगो गुजरात आणि इराणहून स्थलांतर करून येतात आणि नोव्हेंबर ते जून या कालावधीत मुंबईत वास्तव्य करतात.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याला जोडणार्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचे समोर येत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी आज गुरुवारी (१ मे) सांगितले की, भारताचा मीडिया आणि मनोरंजन उद्योग पुढील दशकात १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढू शकतो.