महाराष्ट्र शासनाने राज्य अॅग्रीगेटर कॅब धोरण २०२५ अंतर्गत एक नवे आदेश लागू केले आहे, ज्यामुळे ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांना ड्रायव्हरने राईड रद्द केल्यास प्रवाशाला भरपाई देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुबई - महाराष्ट्र शासनाने राज्य अॅग्रीगेटर कॅब धोरण २०२५ अंतर्गत एक नवे आदेश लागू केले आहे, ज्यामुळे ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांना ड्रायव्हरने राईड रद्द केल्यास प्रवाशाला भरपाई देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्ह सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रमुख शहरांतील जुनी समस्या — आता होणार संपुष्टात
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये अनेक वर्षांपासून प्रवाशांना ड्रायव्हरकडून राईड रद्द केल्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः गर्दीच्या वेळी, खराब हवामानात किंवा कमी उत्पन्न मिळणाऱ्या भागांमध्ये याचे प्रमाण जास्त होते. सरकारच्या या नवीन नियमांमुळे हा त्रास संपवण्याची शक्यता आहे. तसेच प्रवाशी-केंद्रित संस्कृतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
राईड रद्द करण्याचे धोरण काय सांगते?
जर ड्रायव्हरने राईड स्वीकारल्यानंतर कोणताही वैध कारणांशिवाय रद्द केली, तर कंपनीला प्रवाशाला भरपाई द्यावी लागेल.
भरपाईचे स्वरूप:
क्रेडिट
कॅशबॅक
पुढच्या प्रवासावर सवलत
याचा उद्देश: अनावश्यक राईड रद्दी करण्याला आळा घालणे.
वैध कारणे: आपत्कालीन स्थिती किंवा तांत्रिक अडचणी.
हा निर्णय का महत्त्वाचा आहे?
राईड रद्द केल्याने :
महत्वाच्या बैठका चुकल्या
वेळेचा अपव्यय झाला
प्रवाशांचा चिडचिडेपणा वाढला
यापूर्वी कोणतीही कडक कारवाई किंवा दंडप्रथा नव्हती.
आता कंपन्यांना ड्रायव्हर्सना अधिक प्रशिक्षित, निगराणी आणि व्यवस्थापित करावं लागेल.
प्रवाशांना विश्वासार्ह आणि वेळेवर सेवा मिळण्याची खात्री.
इतर महत्त्वाचे मुद्दे — धोरण २०२५
ड्रायव्हरची माहिती बंधनकारक
प्रत्येक प्रवासापूर्वी अॅपमध्ये हे तपशील स्पष्टपणे दाखवणे आवश्यक:
पूर्ण नाव
परवाना क्रमांक
छायाचित्र
प्रवाशांसाठी विमा कवच
प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना किमान अपघात विमा कवच मिळणार.
अपघात झाल्यास आर्थिक मदतीची शाश्वती.
भाडे नियंत्रण आणि सर्ज प्रायसिंग मर्यादा
सरकार कॅबचे मूलभूत भाडे ठरवेल.
पीक अवर्स, सण-उत्सव, आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्ज प्रायसिंगला मर्यादा.
वाहनाची वयोमर्यादा आणि फिटनेस चाचणी
सर्व कॅब्सनी ठराविक वयाच्या आत असणे आवश्यक.
नियमित फिटनेस व प्रदूषण चाचणी अनिवार्य, सुरक्षिततेसाठी.