जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बायसरन मेडोवर दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले आहे. यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून १२ जखमी झाले आहे. टीआरएफने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने काही नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
योगगुरू बाबा रामदेव यांनी दिल्ली उच्च न्यायालयाला आश्वासन दिले आहे की त्यांच्या वादग्रस्त "शरबत जिहाद" टिप्पणी असलेले सर्व व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्ट काढून टाकण्यात येतील.
१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर विविध राज्यांमध्ये झालेल्या हल्ल्यांबद्दल बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी चिंता व्यक्त केली आहे.
बेंगळुरूमध्ये एका ऑटो चालकाला हिंदीत बोलल्याबद्दल धमकावणाऱ्या उत्तर भारतीय व्यक्तीने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर माफी मागितली आहे. या व्यक्तीने ऑटो चालकाला बेंगळुरूमध्ये टिकण्यासाठी हिंदी शिकण्याची धमकी दिली होती.
कर्नाटकचे माजी पोलीस प्रमुख ओम प्रकाश यांची त्यांच्या पत्नीनेच हत्या केली. रविवारी घरात झालेल्या भांडणानंतर पत्नीने त्यांच्यावर मिरची पावडर फेकली, त्यांना बांधले आणि चाकूने भोसकून हत्या केली. मुलीचीही चौकशी सुरू आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ‘होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट्स फॉर प्राइम मिनिस्टर्स अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन’, ‘सिलेक्ट इनोव्हेशन्स फ्रॉम प्राइम मिनिस्टर्स अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन’ पुस्तके प्रकाशित केली.
Us Vice President JD Vance Visit : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष डेविड जेम्स तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासह देशातील काही प्रमुख स्थळांना भेट देणार आहेत.
Jammu Kashmir landslide : जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात झालेला तुफान पाऊस आणि ढगफुटीमुळे भूस्खलन झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुर देखील आला असून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय 100 हून अधिक जणांचा रेस्क्यू केलेय.