Us Vice President JD Vance Visit : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष डेविड जेम्स तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासह देशातील काही प्रमुख स्थळांना भेट देणार आहेत.
Us Vice President JD Vance Visit : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेम्स डेविड म्हणजेज जेडी वेंस 23 एप्रिला आगरा येथे पोहोचणार आहेत. याआधी आगरामधील खेरिया विमानतळावर मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी त्यांचे स्वागत करणार आहेत. उपराष्ट्राध्य परिवारासह आगरा दौरा आणि ताजमहलाला भेट देणार असल्याने तय्यत तयारी सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी आलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमामे जेडी वेंस यांचे स्वागत केले जाणार आहे. यावेळी रस्त्यांच्या कडेला काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय 5 हजार मुलं रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उपराष्ट्राध्यक्षांचे स्वागत करणार आहेत. जेडी वेंस आपली पत्नी, मुलांसह ताजमहलाला भेट देणार आहेत.
तीन तास ताजमहलात घालवणार
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेम्स डेविड तीन दिवसांच्या भारतीय दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज भेट घेणार आहेत. यानंतर जेम्स डेविड जयपूरचा दौरा करणार आहेत. याआधी ताजमहलाला भेट देत तेथे तीन तास घालवणार आहेत. यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना ताजमहालासाठी प्रवेश बंद केला जाणार आहे.
शाळकरी मुलं करणार स्वागत
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांचे भव्यदिव्य स्वागत केले जाणार आहे. खेरिया विमानतळापासून ते ताजमहालापर्यंतच्या 12 किलोमीटर रस्त्यावरील 15 ठिकाणी लोक कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. यामध्ये भारतीय कला आणि संस्कृतीची झलक दिसणार आहे. आठ ठिकाणी स्वागत मंच देखील तयार करण्यात आले आहेत. खेरिया विमानतळापासून ते शिल्पग्रामपर्यंत संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा शाळेतील मुल त्यांचे स्वागत करणार आहेत. यासाठी 20-25 शाळेतील मुलांना स्वागतासाठी बोलावण्यात आले आहे.
कठोर सुरक्षाव्यवस्था
उपराष्ट्राध्यांच्या दौऱ्यादरम्यान, कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी अमेरिकेतील अॅडव्हान्स टीम आगरा येथील खेरिया विमानतळ ते शिल्पग्राम, ताजमहल परिसरात आधीच तैनात आहे. याच आधारावर आगरा पोलिसांनी सुरक्षाव्यवस्थेचा प्लॅन तयार केला आहे. अतिरिक्त पोलीस कर्मचारी देखील तैनात असणार आहेत.
5 वर्षांपूर्वी आले होते डोनाल्ड ट्रम्प
पाच वर्षांपूर्वी 24 फेब्रुवारी 2020 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम् आपली पत्नी मेलानिया, मुलगी इवांका, जावई यांच्यासोबत आगरा येथे आले होते. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीने ताजमहलााल भेट दिली होती. दोघेजण जवळजवळ 45 मिनिटे ताजमहालात होते.