अलेफ एरोनॉटिक्सने उड्डाण करणाऱ्या कारचा पहिलाच व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, जो वाहतुकीच्या इतिहासात एक महत्त्वाचा क्षण आहे. पूर्णपणे इलेक्ट्रिक असलेली मॉडेल ए, ३००,००० डॉलर्स किमतीची असून ११० मैलांचे उड्डाण करू शकते.
भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये पाकिस्तानच्या १६० हून अधिक सैनिक ठार झाले. या हल्ल्यांनंतर पाकिस्तानने भारताशी संपर्क साधून युद्धविरामाची विनंती केली.
मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (MQM) चे संस्थापक अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानातील मोहाजिर समुदायाच्या छळाविरोधात आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की कॅनडा जर अमेरिकेचे "५१ वे राज्य" बनण्यास सहमती दर्शविल्यास त्यांच्या प्रस्तावित "गोल्डन डोम" क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीमध्ये "शून्य खर्चात" समाविष्ट केले जाऊ शकते.
लिव्हरपूलच्या विजयाच्या जल्लोषात एक कार गर्दीत घुसल्याने अफरातफर माजली आणि अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या दुर्घटनेत 27 जखांना दुखापत झालीये.
राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या व्हिएतनाम दौऱ्यात त्यांच्या पत्नी ब्रिजिट यांनी विमानाच्या दारातच त्यांच्या कानाखाली लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे की ते मजेच्या मुडमध्ये होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या आयात शुल्क धोरणामुळे ॲपल आणि सॅमसंगसारख्या कंपन्यांवर दबाव वाढला असून, भारतासाठी स्मार्टफोन उत्पादनात मोठी संधी निर्माण झाली आहे.
किम जोंग उन यांच्या उपस्थितीत ५००० टन वजनाची नवी युद्धनौका लाँचिंगच्या वेळी पाण्यात पलटली. उपग्रह छायाचित्रांमध्ये जहाज उलटे दिसले. किम यांनी या अपयशाला "अक्षम्य अपराध" म्हटले आहे.