गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषणाशी झुंज देणाऱ्या दिल्लीकरांना आता एका नव्या श्वसनविकाराचा सामना करावा लागत आहे. प्रदूषित हवेमुळे अनेकांना 'वॉकिंग न्यूमोनिया'ची लागण होऊ लागली आहे.
मणिपूरमध्ये वाढत्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १०,८०० अतिरिक्त सैनिक तैनात करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती मणिपूरचे मुख्य सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग यांनी दिली.
वीरेंद्र सेहवागचा मुलगा द्विशतक: भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने द्विशतक (२००*) झळकावले आहे. ३४ चौकार आणि २ षटकारांसह त्याने दिल्लीसाठी एक अफलातून खेळी केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया बोर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत आमने-सामने येणार आहेत. मालिका सुरंभ होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीचा क्रेझ पाहायला मिळत आहे.
आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे एका लग्नादरम्यान वराच्या मित्राला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना त्यावेळी घडली जेव्हा तो वधू-वराला गिफ्ट देत होता.