महिला मंत्र्याला अश्लील मेसेज! 'सायबर पोलिसांनी' पुण्यामधून उचलले 'महाविद्यालयातील माथेफिरूला'महाराष्ट्रातील एका महिला मंत्र्यांना सोशल मीडियावर अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. बीडचा रहिवासी असलेला हा तरुण सध्या पुण्यात शिक्षण घेत आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून, पुढील तपास सुरू आहे.