मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील पाच मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर शनिवारी दुपारी भीषण आग लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, गोल मशीद जवळील झैफर हॉटेलच्या शेजारी असलेल्या मरीन चेंबरजवळ दुपारी १२:२६ वाजता ही घटना घडली.
प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रबोर्ती यांच्या स्टुडिओतून ४० लाखाची चोरी झाली असून, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयला अटक करण्यात आली आहे. आरोपी जम्मू-काश्मीरमध्ये पकडला गेला असून, चोरीच्या रकमेपैकी ९५ टक्के रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेब्रुवारी ११ आणि १२ रोजी कोट्यवधी रुपयांचे सोने आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती कस्टम्स विभागाने दिली.
गेल्याच महिन्यात अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाने तहव्वूर राणाच्या भारतातील प्रत्यार्पणासाठी मंजूरी दिली होती. या खटल्यातील तहव्वूर राणाच्या शिक्षेविरुद्धची त्याची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली होती.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 2025-26 येत्या 4 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले असून कोणत्या विभागाला किती रक्कम खर्चासाठी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चेंबूरमधील सुमननगर येथे मेट्रोचा पिलर कोसळल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे.
मुंबईसह कोल्डप्ले कॉन्सर्ट गुजरातमधील अहमदाबाद येथे देखील होणार आहे. वर्ष 2016 नंतर पहिल्यांदा कोल्डप्लेचा भारतात पुन्हा शो होणार आहे. यामुळे वाहतूक पोलिसांकडून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यासह रस्ते मार्गात बदल केले आहेत.