सध्या देशभरात ज्योती मल्होत्राचे नाव चर्चेत आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना अटक झालेली ही ज्योती कोण आहे? तिची पार्श्वभूमी काय आहे? तिने पाकिस्तानसाठी नेमके काय केले? यासारखी संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया.
ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर हल्ला तीव्र केला आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांच्या नुकसानीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
अमेरिका हे भारतातील आंबे निर्यातीसाठी सर्वात मोठे बाजारपेठांपैकी एक आहे. परंत, अमेरिकेने आंबा नाकारल्याने देवगड, रत्नागिरीसह इतर आंबानिर्यातदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आफताब इक्बाल यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांपैकी दोघे पाकिस्तानी सैन्याचे प्रशिक्षित कमांडो होते असा धक्कादायक खुलासा केला आहे.
आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील द्वारपुडी गावात बंद कारमध्ये अडकल्याने चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सिराज नावाच्या व्यक्तीने विजयनगरमध्ये स्फोटके तयार केली. त्यानंतर समीरसोबत मिळून ती हैदराबादला नेली आणि हल्ला करण्याचा कट रचला. मात्र, त्याआधीच गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या.
पुण्यात बाल्कनीतून कुंडी पडून झालेल्या दुर्घटनेनंतर नोएडासह अनेक शहरांमध्ये खळबळ! सोसायटीमधून गुपचूप कुंड्या हटवल्या जात आहेत, RWA पासून प्रशासनापर्यंत सर्वजण सक्रिय! बाल्कनी आता धोक्याची ठरली आहे का? या गुप्त बदलाचे कारण जाणून घ्या...
19th May 2025 Live Updates : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियात पोस्ट शेअर करत बायडेन यांच्या आजाराबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. आज 19 मे च्या ताज्या आणि ठळक घडामोडी एशियानेट न्यूज मराठीवर नक्की वाचत रहा….
हिसारच्या ट्रॅव्हल यूट्यूबर ज्योती मल्होत्रा यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय लष्कराच्या हालचालींबाबत माहिती पुरवल्याचा आरोप.
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला भारत-पाक संघर्षादरम्यान संवेदनशील डेटा शेअर केल्याच्या आणि पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.