वास्तुशास्त्रानुसार घरात काही पेंटिंग लावणे अशुभ मानले जाते. हिंस्र प्राणी, सूर्यास्त, पूर्वजांचे फोटो, महाभारताची पेंटिंग आणि वाहत्या पाण्याची पेंटिंग घरात लावू नयेत. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि अनेक समस्या निर्माण होतात.
घरासाठी वास्तु टिप्स : आपले घर सुंदर दिसावे म्हणून प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टी आणतो. जसे की पेंटिंग, फोटो किंवा डिझायनर घड्याळे. पण तुम्हाला माहितीये का, वास्तुशास्त्रानुसार काही पेंटिंग घरात लावणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
घर सजवण्यासाठी तुम्ही आवडलेले एखादे पेंटिंग आणण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण वास्तुशास्त्रानुसार, काही पेंटिंग घरात लावणे टाळायला हवे. चला तर मग जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर...
हिंस्र प्राण्यांची पेंटिंग
वास्तुशास्त्रानुसार, घरात कधीही हिंस्र प्राण्यांची (राक्षसी प्राणी) पेंटिंग लावू नये. या फोटोंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. याशिवाय चिडचिड होणे आणि घरात भांडणे होऊ शकतात.
सूर्यास्ताची पेंटिंग
उगवत्या सूर्याची पेंटिंग बरेच जण घरात लावतात. ही पेंटिंग घरातील भिंतींवर सुंदर दिसतात. पण काहीजण उगवत्या सूर्याऐवजी सूर्यास्ताची (सूर्यास्त) पेंटिंग लावतात. सूर्यास्ताची पेंटिंग घरात लावणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. याशिवाय घरात नकारात्मकता वाढून तुम्ही सतत निराश राहता.
पूर्वजांचे फोटो
घरात तुम्ही पूर्वजांचे फोटो लावता का? (पूर्वजांचे फोटो) पण वास्तुशास्त्रात, पूर्वजांचे फोटो घरात लावणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील शांतता भंग पावते. याशिवाय घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
महाभारताची पेंटिंग
महाभारताच्या युद्धाची पेंटिंग घरात कधीही लावू नका. वास्तुशास्त्रानुसार, महाभारताची पेंटिंग लावल्याने घरात अशांतता निर्माण होते आणि वाद-विवाद सतत होत राहतात.
वाहते पाणी
घरात चुकूनही वाहत्या पाण्याची पेंटिंग लावू नका. यामुळे आर्थिक नुकसान होते आणि तुमचे पैसे पाण्यासारखे खर्च होतात.
कोणती पेंटिंग लावावीत?
घरातील भिंतींवर सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी पेंटिंग लावावीत. जेणेकरून तुमच्यावर त्या पेंटिंगचा सकारात्मक प्रभाव पडेल. घरात नेहमीच निसर्गाचे फोटो, पेंटिंग लावावेत. याशिवाय बेडरूममध्ये राधा-कृष्णाचा फोटो लावणे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जाते.
तसेच हिंदू धर्मात धनाची देवी मानल्या जाणाऱ्या देवी लक्ष्मीचा (देवी लक्ष्मी) फोटो किंवा पेंटिंग घरात लावू शकता. यामुळे घरात आर्थिक भरभराट कायम राहते. घराच्या उत्तर दिशेला कुबेर किंवा देवी लक्ष्मीचा फोटो लावावा, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. पण फोटो किंवा पेंटिंगमध्ये देवी बसलेली असावी. यामुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत नाही.
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा:
वास्तु टिप्स : किचनमधील ही भांडी पालथी ठेवणे अशुभ मानले जाते
पैशाशी संबंधित समस्या येत आहेत? नवीन वर्षात करा हे उपाय, होईल धनलाभ
शुभेच्छांसाठी झाडे : नवीन वर्षात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी घरात लावा ही झाडे