राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव यशस्स्वी जैस्वालने सांगितला.
नवी दिल्ली [भारत], (एएनआय): भारताचा उगवता स्टार यशस्वी जयस्वाल राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत काम करणे 'privilege' (सौभाग्य) वाटते. फ्रँचायझीचा कर्णधार आणि राष्ट्रीय सहकारी संजू सॅमसनसोबतच्या खास नात्याबद्दल त्याने सांगितले. जयस्वाल जिओ हॉटस्टारशी बोलत होता. १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर २०२० मध्ये रॉयल्सनी जैस्वालला करारबद्ध केले आणि तेव्हापासून तो फ्रँचायझीसोबत आहे. या युवा खेळाडूने सॅमसनसोबत सलामीची मजबूत जोडी बनवली आहे आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजी युनिटच्या मनात धडकी भरवली आहे.
सॅमसन आणि जयस्वाल यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामात अजूनतरी दमदार खेळ दाखवलेला नाही, तरीही २३ वर्षीय सलामीवीराला आशा आहे की मागील हंगामाप्रमाणे ते या भागीदारीचा आनंद घेऊ शकतील.
"आम्ही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतो आणि मी लहानपणापासून त्याच्यासोबत आहे. मला आमच्यातील मैत्री खूप आवडते - आम्हाला एकत्र वेळ घालवायला आवडतो आणि त्याच्यासोबत खेळायला मजा येते. तो ज्या प्रकारे बोलतो, त्याची शैली - त्याच्या आसपास असणे खूप छान वाटते. अर्थात, आम्ही या हंगामासाठी उत्सुक आहोत आणि मला आशा आहे की आम्हाला यावर्षीही तेवढीच मजा येईल," असे जयस्वाल जिओ हॉटस्टारवर म्हणाला.
चालू हंगामात जैस्वाल पुन्हा एकदा भारताचे माजी प्रशिक्षक द्रविड यांच्यासोबत जोडला गेला आहे. माजी प्रशिक्षकांनी गेल्या वर्षी बारबाडोसमध्ये भारताने टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आपला कार्यकाळ संपवला. द्रविड यांच्या काळात जयस्वालला भारतीय संघात कसोटी आणि टी२० मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. द्रविड ज्या पद्धतीने वागतात, त्याबद्द जयस्वाल त्यांचे खूप कौतुक करतो. त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्यासाठी तो खूप उत्सुक आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आत्मसात करण्यास आणि त्यांच्या जवळ असण्याचे भाग्य तसेच शिकण्याची संधी मिळाल्याने तो खूप आनंदित आहे.
"मला वाटते ते एक अद्भुत leader (नेतृत्व करणारे) आहेत - मदत करणारे, काळजी घेणारे आणि नेहमीच प्रत्येकाची काळजी घेणारे. ते खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात, ते योग्य ठिकाणी आहेत याची खात्री देतात आणि योग्य मार्गदर्शन करतात, जे वैयक्तिक करिअर आणि संपूर्ण टीमसाठी खूप महत्त्वाचे आहे. ते एक अविश्वसनीय व्यक्ती देखील आहेत. राहुल द्रविड सरांसारखे व्यक्तिमत्व असणे हे भाग्याचे आहे आणि त्यांना जवळून पाहणे ही शिकण्याची संधी आहे - केवळ क्रिकेटबद्दलच नाही, तर ते मैदानाबाहेर स्वतःला कसे सादर करतात याबद्दलही शिकण्यासारखे आहे," तो म्हणाला.
"त्यांनी इतक्या वर्षांपासून आपली grace (नम्रता) आणि composure (संयम) टिकवून ठेवला आहे आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. मी त्यांच्यासोबत येथे असल्यामुळे खूप excited (उत्साहित) आहे आणि त्यांच्यासोबत या TATA IPL (टाटा आयपीएल) हंगामाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहे," असेही तो म्हणाला. (एएनआय)