सार

मुंबईच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाची शैली दाखवत गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. अखेर विजयाची माळ मुंबई इंडियन्सच्या गळ्यात पडली.

मुंबई : आयपीएल २०२५ मधील एका रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने आज गुजरात टायटन्ससमोर २२९ धावांचे प्रचंड लक्ष्य ठेवले आहे. त्याचा पाठलाग करताना गुजरातच्या टीमला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गुजरातचा डाव २०८ धावांमध्येच संपुष्टात आला. त्यामुळे मुंबई इंडियन्सला २० धावांनी दणदणीत विजय नोंदवता आला. मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये धडक दिली आहे. अखेरच्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन यांनी केलेल्या शिस्तबद्ध बॉलिंगमुळे मुंबईचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.

मुंबई इंडियन्सच्या डावात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या फलंदाजांनी झळकावलेली अर्धशतके आणि फटकेबाजीमुळे संघाला हा मोठा स्कोअर उभारता आला. मुंबईच्या डावात विस्फोटक सुरुवात, मधल्या फळीत सुसाट फटकेबाजी, आणि शेवटच्या षटकांतील धडाकेबाज फिनिशिंग यामुळे हा स्कोअर शक्य झाला.

रोहित शर्माने ८१ धावा, जॉनी बेयरस्टो ४७ धावा, सूर्यकुमार यादव ३३ धावा, तिलक वर्मा २५ धावा, तर हार्दिक पंड्याने ९ चेंडूत २२ धावा करत मुंबईला ५ बाद २२८ धावांवर नेऊन ठेवलं. गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करत मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरमध्ये विजयासाठी २२९ धावांचं मोठं आव्हान दिलं होतं.

या आव्हानाचा पाठलाग करणार्या गुजरातचा डाव २०८ धावांमध्ये गुंडाळण्यात मुंबई इंडियन्सला यश आले. अखेरचे तीन ओव्हर रोमांचक राहिले. परंतु, गुजरातच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे त्यांनी २० धावांनी हा सामना गमावला. त्यामुळे मुंबईला दणदणीत विजय मिळवता आला. या विजयासह मुंबईचा दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश झाला आहे.

आयपीएल २०२५च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा पराभव करत स्पर्धेतील पुढील टप्प्यासाठी आपले आव्हान कायम ठेवले आहे. रोहित शर्माच्या जोरदार ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने २२८ धावांचा डोंगर उभा करत गुजरातसमोर प्रचंड आव्हान ठेवले होते.

गुजरातनेही शेवटपर्यंत झुंज दिली, पण साई सुदर्शनच्या ८० धावांच्या शानदार खेळीनंतरही मुंबईच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी वर्चस्व गाजवत सामना आपल्या बाजूने खेचून आणला.

 

Scroll to load tweet…

 

सामन्याचे ठळक क्षण : 

रोहित शर्माला दोन जीवदान मिळाले, पण त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला.

रोहित आणि जॉनी बेअरस्टोने पॉवर प्ले मध्ये ७९ धावांची धडाकेबाज भागीदारी करत सुरुवातीलाच गुजरातच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.

जॉनी बेअरस्टो ४७ धावांवर बाद झाला असला तरी रोहितने धावांचा धडाका कायम ठेवत ८१ धावांची स्फोटक खेळी साकारली.

मुंबई इंडियन्सने एकूण २२८ धावांची मोठी मजल मारली.

प्रत्युत्तरात गुजरातकडून साई सुदर्शनने ८० धावांची खेळी करत विजयासाठी झुंज दिली.

मात्र, अखेरच्या षटकात मुंबईच्या गोलंदाजांनी कसून खेळ करत विजयाची मुहर उमठवली.

क्वालिफायर २मध्ये मुंबईचा प्रवेश या विजयामुळे मुंबई इंडियन्सचा संघ आता क्वालिफायर २ मध्ये पोहोचला आहे, जिथे त्यांचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. हा सामना जिंकला तरच मुंबई थेट फायनलमध्ये धडक देऊ शकेल.

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी 

या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रोहित शर्माच्या अनुभवाचा, आणि मुंबईच्या फलंदाजी व गोलंदाजीतील संतुलनाचा उपयोग करत संघाने अजून एक पाऊल फायनलच्या दिशेने टाकले आहे.

क्वालिफायर २मध्ये मुंबईचा मुकाबला पंजाबशी होईल. त्यात विजय मिळाला तर फायनलमध्ये प्रवेश होईल.