उरणच्या मैथिली पाटील हिचा गुजरातमधील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमान कोसळले. तिचा शेवटचा व्हॉट्सअॅप मेसेज आता तिच्या आठवणींची एकमात्र गोष्ट उरली आहे.

उरण | प्रतिनिधी – "बाय गं... मी निघतेय!" – हे शब्द वाचून कुणाचंही मन भरून येईल. रायगड जिल्ह्यातील उरणच्या मैथिली पाटील हिने आपल्या बालमैत्रिणीला व्हॉट्सअॅपवर पाठवला आणकाही तासांतच तिचा मृत्यू झाला. गुजरातमधील एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमान अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मैथिली पाटील ही अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानात प्रवास करत होती. मात्र, टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले आणि देशाला हादरवणारा अपघात घडला. या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आणि त्यातच मैथिलीनेही प्राण गमावले.

मैथिली ही अत्यंत हुशार, हसतमुख आणि स्वप्नाळू स्वभावाची मुलगी होती. ती दोन वर्षांपासून हवाई सुंदरी म्हणून काम करत होती. मात्र नियतीने तिच्या आयुष्याच्या शेवट इतक्या हृदयद्रावक पद्धतीने लिहिला की, तिच्या कुटुंबीयांसह संपूर्ण उरणमध्ये शोककळा पसरली आहे. तिचा शेवटचा व्हॉट्सअॅप मेसेज आता तिच्या आठवणींची एकमात्र गोष्ट उरली आहे.

दुर्घटनेनंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून DGCA कडून अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे. पण एक प्रश्न सगळ्यांना पडला असून असा अपघात परत घडणार नाही याची शाश्वती कोण देणार?