जुना स्मार्टफोन विकण्यापूर्वी बँकिंग अॅप्स डिलीट करणे, कॉल आणि मेसेज हटवणे, फोटो-व्हिडीओचा बॅकअप घेणे, सर्व अॅप्स आणि सोशल मीडिया अकाउंट्स लॉगआउट करणे, व्हॉट्सअॅपचा बॅकअप घेणे यासारख्या गोष्टींची काळजी घ्या.
स्मार्टफोन सुरक्षिततेचे टिप्स: बाजारात नवनवीन स्मार्टफोन येत असतात. त्यामुळे अनेकजण जुना फोन देऊन नवा फोन घेतात. पण जुना फोन विकण्याआधी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. नाहीतर मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. शिवाय, जुन्या फोनमधला खासगी डेटाही लीक होऊ शकतो. त्यामुळे पुढील गोष्टी लक्षात ठेवा. जाणून घेऊया सविस्तर...
बँकिंग अॅप्स डिलीट करा
जुना फोन विकण्याआधी सर्व बँकिंग अॅप्स डिलीट करा. आपण बँकिंग अॅप्स मोबाईल नंबरशी जोडतो. त्यामुळे जुन्या फोनमधली बँकेची माहिती लीक होऊ नये म्हणून ती डिलीट करा. यामुळे भविष्यात होणाऱ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचाल.
कॉल आणि मेसेज हटवा
जुना फोन विकणार असाल तर त्यातले कॉल आणि मेसेज हटवा. महत्त्वाचे मेसेज आणि कॉल लीक झाले तर मोठा फटका बसू शकतो. कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेज पूर्णपणे डिलीट झालेत याची खात्री करा.
फोटो-व्हिडीओचा बॅकअप घ्या
जुन्या फोनमधले फोटो-व्हिडीओ, गुगल ड्राइव्ह, मायक्रोसॉफ्ट वन ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स किंवा इतर क्लाउड सेवेच्या मदतीने बॅकअप घ्या. डेटा सुरक्षित राहील आणि जुन्या फोनमधून तो डिलीटही करता येईल.
सर्व अॅप्स आणि सोशल मीडिया अकाउंट्स
नवा फोन घेण्याआधी जुन्या फोनमधले सर्व अॅप्स आणि अकाउंट्स लॉगआउट करा. सोशल मीडिया आणि बँकिंग अकाउंट्स लॉगइन नाहीत ना ते पाहा. सोशल मीडिया आणि बँकिंग अकाउंट्सचे पासवर्डही बदला.
व्हॉट्सअॅपचा बॅकअप घ्या
जुना फोन रिसेट करण्याआधी आणि विकण्याआधी व्हॉट्सअॅपचा बॅकअप घ्या. नाहीतर तुमचे चॅट्स आणि व्हॉट्सअॅप नंबर नव्या फोनमध्ये मिळणे कठीण होईल. बॅकअप असेल तर सर्व चॅट्स आणि नंबर नव्या फोनमध्ये मिळतील.