चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपींपैकी ऑरेंज चिकन ही एक वेगळीच रेसिपी आहे. ही चायनीज-अमेरिकन रेसिपी असून चिकनला आंबट-गोड चव देते. चला तर मग जाणून घेऊया ही रेसिपी स्टेप बाय स्टेप.

ऑरेंज चिकन रेसिपी : तुम्हाला चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार करायला आवडतात का? आज आपण ऑरेंज चिकनची रेसिपी पाहणार आहोत. खरंतर ऑरेंज चिकन ही एक चीनी-अमेरिकन रेसिपी आहे. या रेसिपीमधील कुरकुरीत चिकनला आंबट-तिखट चव असते. जाणून घेऊया याची रेसिपी स्टेप बाय स्टेप....

साहित्य

  • अर्धा किलो बोनलेस चिकन
  • एक कप कॉर्नस्टार्च
  • एक अंड
  • मीठ चवीनुसार
  • काळी मिरी
  • तेल

सॉससाठी साहित्य

  • एक कप संत्र्याचा रस
  • संत्र्याची साल
  • एक तृतीयांश चमचा सोया सॉस
  • एक चतुर्थांश चमचा व्हिनेगर
  • एक चमचा बारीक चिरलेले आले
  • एक चमचा बारीक चिरलेली लसूण
  • एक तृतीयांश चमचा ब्राउन शुगर
  • एक मोठा चमचा कॉर्नस्टार्च
  • कांद्याची पात
  • तीळ

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात बोनलेस चिकन घेऊन त्यावर मीठ आणि काळी मिरीची पूड टाका. आता कॉर्नस्टार्चमध्ये अंडे आणि थोडे पाणी मिसळून बॅटर तयार करून ते चिकनमध्ये मिसळा.
  • चिकन व्यवस्थित मॅरीनेट झाल्यानंतर गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल गरम करा. आता तेलामध्ये मॅरीनेट केलेले चिकन तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. चिकन तळून झाल्यानंतर एका दुसऱ्या भांड्यात ते काढून ठेवा.
  • सॉस तयार करण्यासाठी, पॅन गॅसवर मंद आचेवर ठेवून त्यामध्ये संत्र्याचा रस, संत्र्याची साल, सोया सॉस, व्हिनेगर, ब्राउन शुगर, आले, लसूण मिसळा. सर्व गोष्टी उकळल्यानंतर त्यामध्ये कॉर्नस्टार्च मिसळा.
  • सॉस घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये तळलेले चिकन व्यवस्थित मिसळा. ऑरेंज चिकन तयार झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून त्यावर चिरलेली कांद्याची पात आणि तीळ घालून सजवा.