Frozen Dessert vs Ice Cream : उन्हाळ्याच्या दिवसात बहुतांशजण आइस्क्रिम खातात. पण आइस्क्रिम समजून फ्रोजन डेझर्ट खात असाल तर काय? खरंतर, फ्रोजन डेझर्ट आणि आइस्क्रिम या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
Frozen Dessert vs Ice Cream : उन्हाळ्याच्या दिवसातील कडक उन्हामुळे अंगाची ल्हाईल्हाई होते. अशातच शरीराला थंडावा मिळण्यासाठी आइस्क्रिम, कोल्ड ड्रिंकचे सेवन केले जाते. पण मार्केटमध्ये सध्या आइस्क्रिमपेक्षा फ्रोजन डेझर्टची अत्याधिक विक्री होतेय. यामुळे आइस्क्रिम आणि फ्रोजन डेझर्टमधील फरक जाणून घेऊया. याशिवाय फ्रोजन डेझर्ट खाल्ल्याने काय नुकसान होते हे देखील पाहू.
आइस्क्रिम आणि फ्रोजन डेझर्टमधील फरक
आइस्क्रिम दूध किंवा क्रिमपासून तयार केले जाते. पण फ्रोजन डेझर्टमध्ये व्हेजिटेबल फॅटचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, मिल्क फॅटची किंमत 400 रुपये प्रति किलो असल्यास व्हेजिटेबल फॅटची किंमत 100 रुपयांच्या आसपास असते. अशातच आइस्क्रिमच्या तुलनेत फ्रोजन डेझर्टच्या किंमती कमी अतात. याशिवाय फ्रोजन डेझर्टमध्ये लिक्विड ग्लुकोजचा वापर केला जातो.
दुसऱ्या बाजूला आइस्क्रिममध्ये कॅलरीज अधिक असतात. कारण आइस्क्रिम तयार करण्यासाठी मिल्क फॅटचा अधिक वापर केला जातो. पण फ्रोजन डेझर्टमध्ये कमी कॅलरीज असतात. मात्र यासाठी डेअरी प्रोडक्ट्सचा वापर केला जात नाही.
आरोग्यासाठी नुकसानदायक फ्रोजन डेझर्ट
ट्रान्स फॅटचा परिणाम
फ्रोजन डेझर्टमध्ये असणाऱ्या हाइड्रोजेनेटेड व्हेजिटेबल ऑइलमध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण अधिक असते. ट्रान्स फॅट हृदयासंबंधित आजार, लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. याशिवाय शरीरातील मेटाबॉलिज्म मंदावला जातो.
साखर आणि कॅलरीजचे प्रमाण
आइस्क्रिम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. पण फ्रोजन डेझर्टमध्ये आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे पचनक्रिया बिघडू शकते.
पचनासंबंधित समस्या
फ्रोजन डेझर्टमध्ये व्हेजिटेबल तेल आणि आर्टिफिशियल फ्लेवर्स असल्याने पोटात जळळ आणि पचनासंबंधित समस्या उद्भवू शकते.
असे ओखळा फ्रोजन डेझर्ट
आइस्क्रिम खरेदी करण्यापूर्वी त्याच्या पाकिटावर दिलेली माहिती आणि त्यामधील सामग्री वाचून पहा. येथे तुम्हाला आइस्क्रिम तयार करण्यासाठी डेअरी प्रोडक्ट्स की व्हेजिटेबल ऑइलचा वापर केलाय हे कळले जाईल.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)