छत्तीसगढ-तेलंगणा सीमेवर सुरक्षा बलासोबत गुरुवारी झालेल्या चकमकमीत तीन नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. नक्षलवाद्यांसोबत चकमकीत सकाळी छत्तीसगढच्या बीजापूर जिल्ह्यातील सीमेवरील करेगुट्टाच्या डोंगरांच्या जंगलात झाली.
Chhattisgarh telangana border naxalites killed : छत्तीसगढ-तेलंगणाच्या सीमेवर सुरक्षा बलासोबत गुरुवारी (24 एप्रिल) झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, सुरक्षा बलाची एक संयुक्त टीम दहशतवादी विरोधी अभियानासाठी निघाली असता बीजापूर जिल्ह्यातील आंतरराज्यीय सीमेवरील करेगुट्टाच्या डोंगराळ भागातील जंगलात चकमक झाली. यामध्ये तीन नक्षलवादी ठार झाल्यानंतर त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. याशिवाय अन्य तीन दहशतवादीही ठार झाल्याची शक्यता आहे.
पोलिसांनी सांगितले की, बस्तर क्षेत्रात सुरु करण्यात आलेली सर्वाधिक मोठी दहशतवादी विरोधी कारवायांपैकी एक हे अभियान जिल्हा रिझर्व्ह गार्ड, एसटीएफ, राज्य पोलीस यांच्यासह सीआरपीएफ, कोबरा यांच्यासह वेगवेगळ्या पथकातील जवळजवळ 10,000 सुरक्षारक्षकांचा समावेश आहे.
अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले की, तेलंगणा पोलिसांकडून देखील ऑपरेशनमध्ये सहकार्य केले जात आहे. त्यांनी म्हटले की, माओवाद्यांची सर्वाधिक मजबूत सैन्य संघटना बटालियन क्रमांक 1 आणि माओवाद्यांचे तेलंगणा राज्य समितीचे वरिष्ठ कॅडर यांच्या उपस्थितीसह मिळालेल्या माहितीच्या आधारावर सोमवारी ऑपरेशन सुरू करण्यात आले होते . हे ऑपरेशन काही दिवस सुरू राहू शकते. पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, घनदाट जंगलांमध्ये आणि डोंगराळ भागातील हा परिसर माओवाद्यांच्या बटालियन क्रमांक 1 चा गढ मानला जातो.
7 हजार पोलीस कर्मचाऱ्यांकडून घेराबंदी
छत्तीसगढ, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील जवळजवळ 7 हजार पोलीस कर्मचाऱ्यांकडून परिसराला घेराव घालण्यात आला होता. एका सूत्राने म्हटले की, ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या वाढली जाऊ शकते.