11:19 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates RCB ची फायनलमध्ये 'दणक्यात' एंट्री - पंजाबचं 'पानीपत' करत मिळवला ऐतिहासिक विजय!

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने पंजाब किंग्सचा १०१ धावांत पराभव करत आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये प्रवेश केला. हेझलवूड आणि सुयश शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबला १०१ धावांपर्यंत रोखण्यात आरसीबीला यश आले.
Read Full Story
10:18 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates Top 10 - जगातील ही १० शहरे रात्रीच्या वेळी दिसतात सर्वात सुंदर

जगात अनेक सुंदर शहरं आहेत. काही उंच इमारतींसाठी तर काही स्वच्छता आणि पर्यावरणासाठी प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहितीये का रात्रीच्या वेळी कोणते शहरं सर्वात सुंदर दिसतात? चला जाणून घेऊया.

Read Full Story
09:58 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates CBI ची धडक! मुंबई पासपोर्ट कार्यालयात थेट छापा; लाचखोरी करताना अधिकारी व दलाल अटकेत

मुंबईतील पासपोर्ट कार्यालयात CBI ने लाच घेणाऱ्या कनिष्ठ अधिकारी आणि दलालाला रंगेहात पकडले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याचे उघड झाले असून, त्यांच्याकडून सात बनावट पासपोर्ट अर्जही जप्त करण्यात आले आहेत. 

Read Full Story
09:31 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates महाविकास आघाडीत विसंवाद? राऊतांचा सुळे यांना घणाघात; पवार गटाकडून प्रत्युत्तरात खडेबोल!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. 

Read Full Story
09:11 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates VIDEO - धावत्या बसमध्ये चालकाला हार्टअटॅक, कंडक्टरने वाचवले 35 प्रवाशांचे प्राण

चालकांना हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना वाढत असून, बस प्रवासही भयावह बनत चालला आहे. आता आणखी एका घटनेत वाहन चालवतानाच चालकाचा मृत्यू झाला आहे!

Read Full Story
09:11 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates जालिंदर सुपेकर अडचणीत! तीन मोठ्या जिल्ह्यांतील कारागृह कार्यभार काढला; ऑडिओ क्लिपनंतर गृहविभागाची कारवाई

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवे वळण येत असताना, तिचे मामे सासरे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर गृहविभागाने मोठी कारवाई केली. 

Read Full Story
08:48 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates मुंबईत कुत्रा लिफ्टमध्ये चावल्याप्रकरणी मालकाला ४ महिने तुरुंगवास; दुसरीकडे, अंध कुत्र्याला लिफ्टमध्ये बंदी, मालकाची उच्च न्यायालयात धाव

मुंबईत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाळीव प्राण्यांमुळे वाद निर्माण झाले आहेत. एका प्रकरणात कुत्रा चावल्याने मालकाला शिक्षा झाली आहे, तर दुसऱ्या प्रकरणात अंध कुत्र्याला लिफ्टमध्ये प्रवेश नाकारल्याने मालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Read Full Story
08:20 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates सर्वात मोठी घोषणा! आषाढी वारीत सहभागी 'या' वाहनांना टोलमाफी; एकनाथ शिंदेंकडून महत्त्वाची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी २०२५ साठी वारकऱ्यांना टोल माफी, वैद्यकीय सेवा, विमा संरक्षण, रस्त्यांच्या डागडुजीसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. वारीतील प्रत्येक वारकऱ्यासाठी समूह विमा योजना लागू केली जाणारय.

Read Full Story
06:49 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates चक्क 3 बायका अन् तब्बल 9 मुले, कुटुंबाची देखभाल करण्यासाठी ''तो'' झाला चोर

बंगलुरुमध्ये एका ३६ वर्षीय व्यक्तीला, ज्याच्या तीन पत्नी आणि नऊ मुले आहेत, त्याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे.

Read Full Story
06:22 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates Maharana Pratap Jayanti - कोण आहे त्यांची वंशज, अब्जाधीश असतानाही जगते सिंपल Life

मेवाड राजघराण्याच्या राजकुमारी पद्मजा, महाराणा प्रतापांच्या वंशज असूनही, अब्जावधींच्या मालकिन असतानाही साधे जीवन जगतात. अमेरिकेत स्थायिक असूनही, त्या मेवाडचा वारसा जगभर पोहोचवत आहेत.

Read Full Story
05:51 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates "ही बघा पावती! मी हेक्टर देत होतो, पण त्यांनी फॉर्च्युनरच मागितली" – वैष्णवीच्या वडिलांचा संतप्त खुलासा

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. फॉर्च्युनर गाडी न दिल्यास लग्न मोडण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वैष्णवीच्या चारित्र्यावर शंका घेण्यात येत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.

Read Full Story
05:23 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates Vaishnavi Hagawane Case - पती शशांक हगवणे, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिच्या पती, सासू आणि नणंदला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा खोटा फोन करणाऱ्याला अटक करण्यात आली असून, वैष्णवीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत.
Read Full Story
04:28 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates अतिवृष्टीमुळे बारामतीत नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – अजित पवारांचा पाहणी दौरा, घरात पाणी घुसलेल्या कुटुंबांना १० हजारांची मदत जाहीर

बारामती तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करून पंचनामे आणि मदतीचे निर्देश दिले.
Read Full Story
04:09 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates मुंबई पोलिसातील 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' दया नायक यांना एसीपी पदावर बढती!

मुंबईतील गुन्हेगारी जगताला हादरवणाऱ्या कारवायांसाठी प्रसिद्ध असलेले दया नायक यांना सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) पदावर बढती मिळाली आहे. ग्रामीण कर्नाटकातील सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या नायक यांनी धाडसी निर्णयांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read Full Story
03:36 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates पुणे पुन्हा हादरलं! कोयता गँगचा हैदोस, कॅफेत धाडसी प्रवेश अन् गाड्यांची तोडफोड; परिसरात भीतीचं सावट

पुण्यातील डी.पी. रोडवरील एका कॅफेसमोर कोयता गँगने दहशत माजवली. तिघा गुंडांनी गाड्यांची तोडफोड केली, मात्र पोलीस अद्याप निष्क्रिय आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे.
Read Full Story
03:06 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates आईसोबत अनैतिक संबंधाचा संशय; मित्रानेच केला मित्राचा खून

आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे. या प्रकारानंतर मित्राचा मृतदेह शेतात पुरला गेला.

Read Full Story
03:02 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates Big B यांनी अयोध्येत खरेदी केली 40 कोटींची प्रॉपर्टी, यापूर्वीही तिनदा केलीये गुंतवणूक

बिग बींनी अयोध्येत आणखी एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे, ज्याची किंमत ४० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ही जमीन २५,००० चौरस फुटांमध्ये पसरलेली आहे.
Read Full Story
02:53 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates नाना पाटेकरांनी राजामौली यांचा 1000 कोटींचा चित्रपट नाकारला, 15 दिवसांसाठी मिळाले असते 20 कोटी

नाना पाटेकर यांनी एस.एस. राजामौली यांचा चित्रपट नाकारला: दिग्दर्शक एस.एस. राजामौली त्यांच्या १००० कोटींच्या बजेटच्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी नाना पाटेकर यांना विचारणा केली होती, पण त्यांनी नकार दिला.

Read Full Story
02:34 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates 'भारत राहतात 24 कोटी मुस्लिम', असदुद्दीन ओवैसी यांनी सौदी अरेबियात पाकिस्तानचा बुरखा फाडला

असदुद्दीन ओवैसी यांनी सौदी अरेबियात पाकिस्तानचा पर्दाफाश केला. ते म्हणाले की, भारतात २४ कोटी मुस्लिम गुण्यागोविंदाने आणि अभिमानाने राहतात.

Read Full Story
02:14 PM (IST) May 29

29th May 2025 Live Updates "PoK चे लोग आमचे आहेत, एक दिवस स्वतःच..." राजनाथ सिंहांच्या वक्तव्याने पाकिस्तानची झोप उडाली

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीओकेबाबत मोठे विधान केले आहे. पीओकेमधील लोक आपलेच आहेत, असे ते म्हणाले.

Read Full Story