- Home
- India
- 15th May 2025 Live Updates: कार टो केल्यावर तरुणाचा रस्त्यावर झोपून निषेध; वाहतूक नियमांवर प्रश्नचिन्ह
- FB
- TW
- Linkdin
Follow Us
15th May 2025 Live Updates: कार टो केल्यावर तरुणाचा रस्त्यावर झोपून निषेध; वाहतूक नियमांवर प्रश्नचिन्ह
;Resize=(380,220))
15th May 2025 Live Updates : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज तुक्रिएमध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी चर्चा करणार आहेत. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या बैठकीला उपस्थितीत राहणार नाहीयेत. एशियानेट न्यूजवर देश-विदेशातील आजच्या ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी अपडेट्स वाचत रहा.
15th May 2025 Live Updates कार टो केल्यावर तरुणाचा रस्त्यावर झोपून निषेध; वाहतूक नियमांवर प्रश्नचिन्ह
15th May 2025 Live Updates भारताचा तुर्कीवर पलटवार, विमानतळ सुरक्षा मंजुरी केली रद्द
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल भारताने तुर्की कंपनी सेलेबी ग्राउंड हँडलिंगची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
15th May 2025 Live Updates मुख्यमंत्री फडणवीस वानखेडे स्टेडियमवर स्टँड अनावरण सोहळ्याला राहणार उपस्थित
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या स्टँड अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
15th May 2025 Live Updates ६८ वर्षांच्या आजीने नातवासोबत केली दहावी उत्तीर्ण!
15th May 2025 Live Updates अखेर मोदी सरकारने तुर्कस्थानला धडा शिकवला, मुंबई विमानतळावरील 'सेलेबी' कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द, शिवसेनेच्या आंदोलनाला यश
मोदी सरकारने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ७०% जमिनीवरील सेवा हाताळणाऱ्या तुर्कस्तानी ‘सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस’ या कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे.
15th May 2025 Live Updates मुंबई लोकलमध्ये १९ वर्षीय मुलीचा विनयभंग, व्हिडिओ झाला व्हायरल
15th May 2025 Live Updates "फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होईल.." परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची ठाम भूमिका
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे, की आता पाकिस्तानसोबत केवळ आणि केवळ पीओके आणि दहशतवादावर चर्चा होईल. इतर कोणतेही मुद्दे चर्चेत येणार नाहीत.
15th May 2025 Live Updates मुंबई, पुण्यातील पर्यटन स्थळे सी-प्लेनने जोडणार, एमटीडीसीची महत्त्वाकांक्षी योजना
एमटीडीसीने ९ ते १९ आसन क्षमतेच्या जलविमानांद्वारे मुंबई व पुणे यांना गणपतीपुळे, कोयना धरण, उजनी धरण आणि मांडवा यांसारख्या पर्यटनस्थळांशी जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.
15th May 2025 Live Updates पुलवामा एन्काउंटर: आई म्हणाली- मुलाने आत्मसमर्पण केले
15th May 2025 Live Updates भारतात अॅपल मोबाईलचे उत्पादन थांबू शकते, ट्रम्प यांनी निर्माण केला दबाव
15th May 2025 Live Updates दहशतवाद्यांनी धर्म विचारुन ठार मारले, आम्ही त्यांच्या... राजनाथ सिंहांची श्रीनगरला सिंहगर्जना
राजनाथ सिंह यांचा श्रीनगर दौरा: पहलगाम हल्ल्यानंतर राजनाथ सिंह श्रीनगरला पोहोचले. तिथे त्यांनी पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या मोर्टार आणि गोळ्यांचे पुरावे पाहिले.
15th May 2025 Live Updates इंग्लंड दौऱ्याआधी गौतम गंभीर सिद्धिविनायक चरणी, सहकुटुंब घेतले दर्शन
टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्नी नताशासोबत सिद्धिविनायक मंदिरात भेट देत श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
15th May 2025 Live Updates पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानची केली कुत्र्याशी तुलना, म्हणाले...
मायकेल रुबिन म्हणाले की, भारताने राजनैतिक आणि लष्करी दोन्ही बाजूंनी हे यश मिळवले आहे आणि संपूर्ण जगाचे लक्ष आता पाकिस्तानच्या दहशतवादी पाठिंब्यावर आहे.
15th May 2025 Live Updates जा आणि माफी मागा... कर्नल सोफिया कुरेशींवरील वक्तव्यावरून SC ने भाजपच्या मंत्र्याला फटकारले
कर्नल सोफिया कुरेशींविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरविरुद्धच्या याचिकेवर १६ मे रोजी सुनावणी होणार आहे.
15th May 2025 Live Updates राजामौली यांच्या बायोपिकमध्ये दादासाहेब फाळकेंची भूमिका Jr. NTR साकारणार
पॅन इंडिया स्टार Jr. NTR 'मेड इन इंडिया' या नवीन बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याची बातमी चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरली आहे.
15th May 2025 Live Updates आंबा पिकतो, रस गळतो... पण नैसर्गिक पिकलाय की रासायनिक? जाणून घ्या सोप्या Tips
उन्हाळ्यात लोक आंबे खाण्याचा खूप आनंद घेतात. पण व्यापारी जास्त नफ्यासाठी त्यात केमिकल मिसळतात. तुम्ही विकत घेतलेल्या आंब्यात केमिकल मिसळले आहे का? ते कसे ओळखायचे ते पहा.
15th May 2025 Live Updates HBD Madhuri Dixit माधुरी @ 58, या ७ आयकॉनिक चित्रपटांनी तिचे करिअर घडवले
माधुरी दीक्षित हिचा आज वाढदिवस आहे. ती ५८ वर्षांची झाली असली तरी तिचे सौंदर्य अगदी विशीतील तरुणीला लाजवणारे आहे. बॉलिवूडच्या या सदाहरित दिवाला तिच्या अविस्मरणीय चित्रपटांना पुन्हा एकदा पाहून साजरा करण्यापेक्षा चांगला मार्ग कोणता असू शकतो?
15th May 2025 Live Updates पुण्यात पुन्हा कोयता गँगचा थरार, दत्तवाडीत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला
पुण्यातील दत्तवाडी येथील एका व्हिडिओने पुणेकरांची झोप उडाली आहे. यात काही तरुण हातात कोयता नाचवत एका तरुणावर हल्ला करताना दिसत आहेत. या घटनेत हा तरुण जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, कोयता गॅंगवर अंकूश आणण्यात पुणे पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येत आहे.
15th May 2025 Live Updates मुंबईत आज राहणार ढगाळ वातावरण, काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता
मुंबईत आज गुरुवारी हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना हाती छत्री ठेवा. दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे उकाड्यापासून सुटका होईल.
15th May 2025 Live Updates महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी 9 जूनपासून विशेष ट्रेन, या ठिकाणांना देता येणार भेट
येत्या 9 जूनपासून विशेष पर्यटन ट्रेन चालवली जाणार आहे. या ट्रेनच्या माध्यमातून नागरिकांना ऐतिहासिक किल्ले आणि धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे.