सार

Sambhajinagar Crime : संभाजीनगर येथे बापलेकीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी वडिलांनी 19 वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिचे अश्लील व्हिडीओ देखील काढले. यामुळे संताप व्यक्त केला जातोय. 

Sambhajinagar Crime : संभाजीनगरच्या चिखलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानवी संवेदनांना हादरवणारी घटना समोर आली आहे. येथे एका नराधम सावत्र बापाने आपल्या १९ वर्षीय सावत्र मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. आरोपीने अत्याचार करतानाचे व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केले आणि पीडितेला ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या गंभीर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

पीडितेवर महिनाभर अत्याचार, व्हिडीओच्या माध्यमातून धमकी

पीडितेवर २२ एप्रिल ते २२ मेदरम्यान सातत्याने अत्याचार करण्यात आले. आरोपी सावत्र बापाने मुलीला रात्रभर झोपेतून उठवून हॉलमध्ये नेले आणि तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनेचे त्याने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी देत त्याने मागील महिनाभर पीडितेचे लैंगिक शोषण चालू ठेवले. रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने ही माहिती आईला दिली.

आईने दाखवले धैर्य, पोलिसांत दिली तक्रार

पीडितेच्या आईने धैर्य दाखवत चिखलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर बलात्कार, धमकी, आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

कुटुंबातील पार्श्वभूमी आणि आरोपीचे वर्तन

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईचा हा दुसरा विवाह आहे. चार वर्षांपूर्वी तिचा आरोपीसोबत विवाह झाला होता. आईला मेंदूशी संबंधित आजार असल्याने ती अनेक गोष्टी विसरते. पीडितेला पहिल्या विवाहापासून दोन बहिणी आहेत, तर दुसऱ्या विवाहानंतर तिसरी मुलगी आहे. हे सर्व कुटुंब एकत्र राहत आहे.

घटनेच्या रात्री सर्वजण झोपले असताना रात्री सुमारे अडीच वाजता आरोपीने पीडितेला आईच्या तब्येतीचा बहाणा करून रूमबाहेर बोलावले. रूमबाहेर आल्यावर त्याने तिला जबरदस्तीने हॉलमधील सोफ्यावर नेले आणि बलात्कार केला. नंतर त्याच घटनेचा व्हिडीओ दाखवून तिला पुन्हा पुन्हा धमकावत लैंगिक शोषण करत राहिला.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

सध्या पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, व्हिडीओ क्लिप्स आणि इतर पुरावे संकलित केले जात आहेत. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.