सार

पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड परिसरातील मेदनकरवाडी येथे 27 वर्षीय विवाहित महिलेवर 21 वर्षीय व्यक्तीने कथित रुपात बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपीच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासात मुसक्या आवळल्या आहेत.

Pune Pimpri Chinchwad Rape Case : पिंपरी-चिंचवड परिसरातील मेदनकरवाडी येथे 27 वर्षीय विवाहित महिलेवर 21 वर्षीय तरुणाने बलात्कार केला. ही घटना अशावेळी घडली जेव्हा महिला एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत नाइट शिफ्ट करण्यासाठी जात होती.

डीसीपी शिवाजी पवार यांच्यानुसार, महिला रात्री उशिरा आपल्या घरातून कंपनीच्या पिकअप पॉइंटच्या दिशेने जात होती. यावेळीच प्रकाश भांगरे नावाच्या आरोपीने तिला एकट्यात पाहिले. यानंतर पीडितेवर भांगरेने हल्ला केला, मान आवळली आणि एका कर्मशियल कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला. येथे आरोपी भांगरेने पीडितेला जीवेमारण्याची धमकी देत कथित रुपात बलात्कार केला. महिलेने विरोध करण्याचा प्रयत्न केला, मदतीसाठी आरडाओरड केली. एवढेच नव्हे आरोपीला चावली देखील तरीही कोणीही मदतीला आले नाही. खरंतर, रात्रीची वेळ असताना कमी रहदारी असल्याने तिला मदत मिळाली नाही. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला.

पीडितेने तिच्यासोबत झालेल्या कृत्यानंतर आजूबाजूच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने चाकण पोलिसांना कळवले. सध्या पीडितेवर यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यानुसार, मेदनकरवाडीमध्ये राहणारा प्रकाश भांगरे हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावातील रहिवाशी आहे.

दरम्यान, पीडितेच्या अंगावर जखमा झाल्या असून तिची वैद्यकिय चाचणी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि गुन्हे शाखेचे 100 पेक्षा अधिक कर्मचारी आरोपीचा शोध घेत होते. अखेर आरोपीला अटक करण्यात आली.