सार

Pune Crime : पुणे येथे कौंटुबिंक वादातन साडूचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Pune Crime : पुण्यात कौंटुबिंक वादातून साडूची हत्या करण्यात आली. हत्येनंतर साडूचा मृतदेह वरंधा घाटामध्ये फेकून देण्यात आला. या मृतदेहाची पोलिसांनी ओखळ पटवत दोन जणांना अटक केली. संतोष पासलकर असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संतोष पिसाळ आणि चंद्रकांत पिसाळ या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नक्की काय आहे प्रकरण?

संतोष पासलकर कोणतेही काम करत नव्हता. याशिवाय त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. दारु प्यायल्यानंतर पासलकर पत्नीला मारहाण करायचा. खरंतर, पासलकर आणि पिसाळ एकमेकांजवळ राहत होते. अनेकवेळा पासलकर पती-पत्नीमधील भांडण सोडवण्यासाठी पिसाळ यांनी मध्यस्थी केली होती. हेच पासलकरला पटत नव्हते.

23 एप्रिलला पुन्हा पासलकर दांपत्यामध्ये वाद झाले. तेव्हा पिसाळसह त्याचा नातेवाईक याने संतोष पासलकरला मारहाण केली असता तो जखमी झाला. जखमी झाल्यानंतर पासलकरचा मृत्यू झाला असता त्याचा मृतदेह वरंधा घाटात फेकून दिला गेला.घाटामध्ये गुरांना घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीने मृतदेह पाहिला असता पोलिसांना कळवण्यात आले

घटनास्थळी पोलीस आले असता, मृतदेहाचे लचके तोडले गेले होते. यानंतर प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला. अशातच तपासाअंती दोन्ही पिसाळ यांना अटक करण्यात आली.